Exclusive Interview With Gashmeer Mahajani
डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चिंचि चेटकीण या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून खास स्पर्धक शोधून आणतेय. पण या कार्यक्रमात परीक्षक कोण असणार हा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला आहे. या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत एक हरहुन्नरी अभिनेता, डान्सर आणि कोरिओग्राफर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर गश्मीर महाजनी आहे. हो हे खरं आहे. आपल्या अभिनय कौशल्यासोबतच गश्मीर एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याला डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये परीक्षकाच्या खुर्चीत पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होईल यात शंकाच नाही.